breaking-newsराष्ट्रिय

भाजपा – जजपा कार्यकर्ते भिडले; वाहनांची तोडफोड, फौजफाटा तैनात

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीअगोदर राजकीय पक्षांमध्ये जोरदार वाद सुरू झाला असल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरच गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी  गुरूग्राम जवळील नूंह येथे भाजपा आणि जननायक जनता पार्टी (जजपा) या पक्षांचे कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी वाहनांची मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली, शिवाय अनेकजण जखमी देखील झाले आहेत. घटनास्थळी परिसरात सीआयएसएफच्या जवानांचा व स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  नूंह येथे भाजपा आणि जननायक जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणामुळे वादाला सुरूवात झाली, या वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर झाले व प्रकरण अधिकच चिघळले. यानंतर घटनास्थळी कार्यकर्त्यांकडून वाहनांची मोठ्याप्रमाणावर तोडफोड करण्यात आली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काठ्यांनी एकमेकांना मारहाण केल्याने यात अनेकजण गंभीर जखमी देखील झाले. घटनेची माहिती मिळाताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button