breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

खासदारांच्या समोरच शिवसैनिकांची पीक विमा अधिकाऱ्यास मारहाण

यवतमाळ येथे नैसर्गिक संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अजूनही पीक विमा कंपन्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नशीबी फक्त प्रतिक्षाच आहे असेच दिसून येत आहे. हतबल शेतकऱ्यांचे करोडो रूपये हडपणाऱ्या विमा कंपन्या बाद कराव्यात आणि पिकविम्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पिकविम्याचे साडेचार लाख रुपये हडपणाऱ्या ईफको टोकियो या कंपनीच्या कार्यालयासमोर गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी घेराव घालून जवाब दो आंदोलन केले आहे.

मात्र या आंदोलनावेळी राडा झाल्याचे पाहण्यास मिळाले. गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळ व्यवस्थापकांशी चर्चा करत असताना शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यवस्थापकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या अंगावर सोयाबीन देखील फेकले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button