breaking-newsताज्या घडामोडीपुणे
चिंबळी येथील केंद्रातून तरुणी बेपत्ता
चिंबळी- येथील स्वाधार केंद्रातून 19 वर्षीय तरूण बेपत्ता असल्याची माहिती महिला स्वाधार केंद्राच्या अधीक्षका प्रतिभा विठ्ठल जुगदार (वय 52) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे. अश्विनी येलप्पा माने (वय 19) असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असून तिचे वर्णन पुढीलप्रमाणे; रंग सावळा उंची 154 सें.मी., कपाळावर व गालावर तिळ, केस काळे, नाकात चमकी, हातात ग्र रंगाच्या बागंड्या या वर्णनाची तरुणी कोठे आढळल्यास त्वरित आळंदी पोलीस ठाण्याशी सपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे, पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे हवलदार एन. पी. बनकर करीत आहे.