breaking-newsमुंबई

खासगी रुग्णालयातील खाटांबाबतच्या ‘या’ निर्णयाला राज्य सरकारची तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई – राज्यात कोरोनावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची कमतरता जाणवत होती म्हणून राज्य सरकारने खासगी आणि धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयातील ८० टक्के खाटा सरकारसाठी राखीव ठेवल्या होत्या. त्याचा कालावधी संपत आला असून राज्य शासनाने या निर्णयाला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मार्च महिन्यापासून महाराष्ट्ररात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मार्च महिन्याच्या अखेरीस रुग्णांची संख्या वाढत गेल्याने कोविड सेंटर उभारणीचे काम सुरू झाले. तसेच, अनेक खासगी रुग्णालयातही कोरोनावर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, खासगी रुग्णालयांनी मनमानी पद्धतीने बिले आकारल्याने आणि सरकारी रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागल्याने राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयने आणि धर्मदाय आयुक्तांकडे असलेल्या रुग्णालयातील ८० टक्के खाटा सरकारने राखीव करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कोरोना आणि अन् रुग्णांवर उपचार करण्यास सुलभ झाले. आता त्यांची मुदत संपत आल्याने पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button