breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हास्ययोग परिवार शाखेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात

जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून कासारवाडी येथील नवचैतन्य हास्ययोग शाखेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात पार पडला.

कासारवाडी येथील सीतांगण उद्यान येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल काटे होते. यावेळी संस्थापक विठ्ठल काटे, सुमन काटे, शिवाजीराव भोसले, पोपटलाल शिंगवी, विश्वास पानसरे, तानाजी जवळकर, माऊली थोरात, माजी नगरसेवक किरण मोटे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, नीता शेंडगे, अॅड. संभाजी बवले आदी उपस्थित होते.

लहान कलाकारांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम साजर करुन उपस्थितांची मने जिंकली. माया गोवर्धन यांनी हास्यावर आधारित भारुड सादर केले. यावेळी विशेष उल्लेखनीय समाजकार्याबद्दल अरुण पवार व उत्तम संगीत संघ चालक म्हणून राजन कमपेल्ली यांना हास्य परिवाराचे सर्वोत्कृष्ट समन्वयक व निवेदक म्हणून अॅड. प्रताप साबळे यांना कासारवाडी शाखेच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत पदमा कासकर, अलका दौंडकर, अंकुश भामे, निलेश धारणकर, रघुनाथ शिंदे, अरुण देशपांडे, दत्तात्रय गोजगे आदींनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button