TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

खबरदार! नववर्षानिमित्त पोलीस ऑन ड्युटी 24 तास

मुंबईः नवीन वर्षाचे स्वागत करताना तुमच्यावर वाहतूक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यानुसार ठाणे आयुक्तालय क्षेत्रात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नववर्षाचे स्वागत असाल तर सावधान, करण्यासाठी . नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण लॉन, फार्महाउस, हॉल घेऊन जल्लोष करतात, सर्वत्र मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित केल्या जातात आणि त्यानंतर दारूच्या नशेत गाड्यांचे अपघात होतात.

यावर्षी देखील ठाण्यातील घोडबंदर रोड तसेच ठाण्याला लागून असलेल्या अनेक ठिकाणी अशा पार्ट्या आयोजित केल्या जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस वाहतूक शाखेने कडक उपाययोजना केल्या आहेत. यावर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात जागोजागी पोलीस कर्मचारी PPE किट घालून मद्यपींवर कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. 25 डिसेंबरपासून आत्तापर्यंत जवळपास 450 ड्रिंक अँड ड्राइव्ह केसेसची नोंद झाली आहे. यावर्षी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या सहप्रवाश्यांवर देखील कारवाई करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. पार्टीमध्ये मद्यप्राशन केल्यास वाहनमालकांनी घरी जाण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांनी पर्यायी व्यवस्था करावी अशी माहिती त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button