breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खडकवासल्यातून पाच हजार क्युसेकने विसर्ग कायम

धरणक्षेत्रांत संततधार; पाणीसाठा ७१ टक्के

पुणे :शहराला पाणीपुरठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारपासून खडकवासला धरणातून पाच हजार क्युसेकने मुठा नदीपात्रात सुरू करण्यात आलेला विसर्ग सोमवारी देखील कायम होता. सध्या धरणांमधील पाणीसाठा ७१ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. दरम्यान, खडकवासलासह चासकमान, वडज, वडिवळे, आंद्रा आणि वीर धरणेही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरण क्षेत्रांत गुरुवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा २१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा झाला आहे.

धरणांमध्ये रविवापर्यंत १९.९२ टीएमसी, तर सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २०.४४ टीएमसी पाणीसाठा होता. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा २१ टक्क्य़ांवर पोहोचला. टेमघर धरण परिसरात दिवसभरात ६० मिलिमीटर, वरसगावमध्ये ७० मि.मी., पानशेतमध्ये ६६ मि.मी. आणि खडकवासलामध्ये नऊ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सद्य:स्थितीत खडकवासला धरण १०० टक्के, त्याखालोखाल पानशेत धरण ७९.८४ टक्के, वरसगाव ६५ टक्के आणि टेमघर धरण ५८ टक्के भरले आहे.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून रविवारपासून पाच हजार १३६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत केला जात आहे. सोमवारी दुपारी तीन हजार, तर सायंकाळपासून पुन्हा पाच हजार क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात दिवसभरात ४१ मि.मी. पावसाची नोंद झाली. हे धरण ६९ टक्के एवढे भरले असून पाणीसाठा ५.८६ टीएमसी झाला आहे. जिल्ह्य़ातील कळमोडी, आंद्रा धरणे १०० टक्के भरली आहेत. तर, वडज, वीर, आंद्रा, वडिवळे आणि चासकमान धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे ३.४१ टीएमसी एवढा झाला असून, या धरणात पावसाची विश्रांती कायम आहे. मात्र, दौंड येथून भीमा नदीत दिवसभरात ४१ हजार २८० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे या धरणातील पाणीसाठा वाढत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (टीएमसी आणि टक्क्य़ांमध्ये)

टेमघर  २.१६   ५८.२७

वरसगाव ८.३३   ६५.००

पानशेत ८.५०   ७९.८४

खडकवासला    १.९७   १००

एकूण साठा     २०.९७  ७१.९७

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button