breaking-newsक्रिडा

क्‍लब ऑफ महाराष्ट्रची कड याच्या शतकावर आगेकूच

पुणे – क्‍लब ऑफ महाराष्ट्र आणि दिवेकर क्रिकेट ऍकॅडमी दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने साहिल कड आणि क्रिश शहापूरकर यांच्या द्विशतकी भागीदाराच्या बळावर दिवेकर क्रिकेट ऍकॅडमी संघाचा पहिल्या डावात आघाडी घेत पराभव करीत विजयी आगेकूच नोंदवली.

डी.के.शेलार मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने 46.2 षटकांत सर्वबाद 152 धावा केल्या तर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दिवेकर क्रिकेट ऍकॅडमीच्या संघाला 60 षटकांत सर्वबाद 148 धावांच करता आल्याने पहिल्या डावात क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाला 4 धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात 4 धावांच्या आघाडीसह खेळताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने 46 षटकांत बिनबाद 223 धावाकरत आपला डाव घोषीत करत दिवेकर ऍकॅडमीच्या संघासमोर विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, दिवेकर ऍकॅडमीला निर्धारीत वेळेत 4 बाद 64 धावांच करता आल्याने पहिल्या डावातील 4 धावांच्या आघाडीच्या बळावर क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाला विजयी घोषीत करण्यात आले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाकडून साहिल कड याने पहिल्या डावात 87 चेंडूत 81 धावा करीत संघाचा डाव सावरला तर दुसऱ्या डावात साहिल आणि क्रिश शहापुरकर या दोघांनीही शतकी खेळी करताना बिनबाद 223 धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. साहिल याने 124 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली तर क्रिश याने 142 चेंडूंचा सामना करताना नाबाद 113 धावांची खेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button