breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानच्या मदरशात मोठा स्फोट; ५ जणांचा मृत्यू, ५० पेक्षा जास्त जखमी

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या पेशावर येथील दीर कॉलनीतील एका मदरशात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिकजण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या स्फोटामागचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही.

काही लोकांच्या मते सिलिंडरचा स्फोट झाल्याने भडका उडाला असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, पोलिसांनी अद्यापही अधिकृत माहिती दिली नसून रेस्क्यू टीम आणि पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी आणि तपासणी करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button