breaking-newsपुणे

13 तारखेपर्यंत पंचिंग पासचा निर्णय

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मे महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पंचिंग पास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने बुधवारी पीएमपी प्रवासी मंचच्यावतीने पीएमपी अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावर 13 जुलैपर्यंत अंतीम निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही गुंडे यांनी दिली.

पीएमपीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सप्टेंबर 2017 रोजी पंचिंग पास बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर 23 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुंढेंचा निर्णय रद्द करत पुन्हा पंचिंग पास सुरू करावा असा ठराव पास करण्यात आला. याला दीड महिना उलटल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पीएमपी प्रवासी मंच, संघटनांच्या वतीने यावेळी गुंडे यांना पंचिंग पास पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी जुगल राठी, विवेक वेलणकर, मारुती भापकर, किशोर मुजुमदार, के.एम. बोरगे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button