breaking-newsपुणे
कान्हुर मेसाईत ४० विद्यार्थ्यांना विषबाधा
पुणे ( महा ई न्यूज ) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हुर मेसाई येथील विद्याधाम प्रशालेतील ४० विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.२२) विषबाधा झाली. शालेय पोषण आहार खिचडी भातातून विषबाधा झाल्याचे वृत्त आहे.
शालेय पोषण आहारामधून देण्यात आलेल्या खिचडी खाण्यात आल्याने हा प्रकारे घडला. शिरूर व कवठे यमाई येथून शासकीय डॉक्टर उपचारासाठी दाखल झाले आहेत. यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थी सुखरूप असल्याचे सांगितले. याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..