breaking-newsताज्या घडामोडीपुणे
कौमार्य चाचणी धडा रद्द करा ; प्राध्यापकाचे ‘एमसीआय’ ला पत्र
पुणे – ‘एमबीबीएस’च्या वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा ‘कौमार्य चाचणी’ हा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा, अशी मागणी एका प्राध्यापकाकडून करण्यात आली आहे.
वर्ध्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी ही मागणी केली. खांडेकर यांनी याबाबत सविस्तर अहवाल तयार करून भारतीय वैद्यकीय परिषदेकडे(एमसीआय) पाठवला आहे. खांडेकर यांनी ही चाचणी अशास्त्रीय, मानवी हक्कांची हनन करणारी, लैंगिक भेदाभेद करणारी आणि निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे.