breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सायकलने जगभ्रमंती करणाऱ्या पुणेकर वेदांगीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून कौतुक!

पुणे –  पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षातील शेवटच्या मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला. या कार्यक्रमातून मोदी यांनी ५१ व्यांदा रेडिओच्या माध्यमातून संवाद साधताना पुणेकर ‘सायकल कन्या’ वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केले.

वेदांगी १९ वर्षीय असून तिने सायकलवरून जगभ्रमंती करण्याचा संकल्प केला आहे. तिने आतापर्यंत २८ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. या प्रवासात आतापर्यंत १५ देशांची भम्रंती केली आहे. वेदांगीने प्रवासाला सुरूवात करून १८० दिवस पूर्ण झाले आहेत. वेदांगी  दिवसाला ३०० किलोमीटर प्रवास करते. जगभ्रमंती सायकलने करण्यासाठी २९ हजार किमी प्रवास पूर्ण आवश्यक आहे. तिने ऑस्ट्रेलियातून सायकल भ्रमंतीला सुरुवात केली. तेथून वेदांगीने न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलँड, स्पेन, फिनलँड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये सायकल प्रवास केला. चाकूहल्ला, पैसे लुटले जाऊनही वेदांगदीने जिद्द सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. देशातील जनतेशी रेडिओच्या माध्यमातून ते संवाद साधतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button