breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लखनौ येथून प्रचारासाठी भाजपचे ४०३ प्रचार रथ रवाना! योगी उपस्थित

 

लखनऊ | टीम ऑनलाइन
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचार रथ तयार केले आहेत. ते ४०३ मतदारसंघांत जाऊन योगी सरकारने ५ वर्षे केलेल्या कामाची माहिती देणार आहेत. आज सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रचार रथांना हिरवा बावटा दाखवला. त्यानंतर ते प्रचारासाठी रवाना झाले.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा प्रचार आणखी वेगाने केला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आग्रा येथील महादेव मंदिरात पूजा करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बरेलीत डोअर-टू- डोअर प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उत्तर प्रदेशात प्रचार दौऱ्यावर आहेत. ते घरोघरी प्रचार करत आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यकर्त्यांच्या छोट्या-छोट्या बैठका घेऊन मार्गदर्शन करत आहेत. त्यात आज सकाळी भाजपने राज्यात प्रचारासाठी प्रचार रथ रवाना केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सकाळी त्यांना हिरवा बावटा दाखवला. या प्रचार रथांच्या स्क्रीनवर योगी सरकारने ५ वर्षांत केलेले काम आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये दाखवली जाणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशातील उद्योजकांच्या संघटना आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

नागरिकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादावरून उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कैराना आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुलंद शहरात आज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचार केला. त्यात त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button