breaking-newsमहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोनाचा रिकव्हरी रेट राज्यात अव्वल

कोल्हापूर : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचं संकट थैमान घालत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आढळून आले. अशावेळीदेखील कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. कोरोनावर मात करण्यात राज्यात कोल्हापूर जिल्हा हा अग्रस्थानी आहे.

जिल्हा प्रशासनाचे नेटकं नियोजन, पोलीस दलाने घेतलेली मेहनत, पालिकेने वेळोवेळी उचललेली कठोर पाऊलं आणि कोल्हापूरकरांनी केलेले नियमांचे पालन यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुमारे 94 टक्के आहे. 750 पैकी 703 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 39 रुग्ण सध्या उपचार घेत असून लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. पण त्यासाठी कोल्हापूरकरांना अजून सतर्क राहणं गरजेचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button