breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘पीसीएमसी’तील ‘या’ अधिकाऱ्यांची ‘ईडी’ मार्फत चौकशी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.त्यामुळे दोषी अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करत त्यांच्या मालमत्तेची व संपत्तीची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

               याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात येणार्या औषध खरेदिसाठी तब्बल विस कोटी रूपयांचे अंदाजपत्रक आहे.यातून गोळ्या-औषधे खरेदी केली जातात. औषध खरेदीत गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवहार चालू असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. दरवर्षी अनेक साहित्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. ही खरेदी म्हणजे सत्ताधारी व अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. एखादी वस्तू बाजारात उपलब्ध असणाऱ्या दरांपेक्षा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्या जातात. ‘वायसीएम’ हॉस्पिटलसाठी यापुर्वी अनेक मशिन्सची खरेदी करण्यात आलेली आहे.मग त्यात ‘एक्स-रे’ विभागासाठी अत्याधुनिक डिजिटल सोनोग्राफी मशीनची खरेदी करण्यात आली होती. या मशिनची खरेदी ही बाजारभावापेक्षा वाढीव दराने करण्यात आली होती. तसेच वायसीएमसाठी ‘हायपर बॅरिक ऑक्सिजन थेरेपी’ (एचबीओटी) मशीन खरेदी करण्यात आले. हे मशीन बाजारात ७० लाख रुपयांना उपलब्ध असताना पावणे तीन कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते.सदर मशिन बंद अवस्थेत असून धुळखात आहे. वायसीएमसाठी १७ व्हेंटिलेटर आणि ४० मल्टिपॅरा मॉनिटर्स खरेदी करण्यात आले होते,त्यातही लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाला होता. वैद्यकीय साहित्य, मशिनरी व विविध उपकरणे खरेदीत यापुर्वीही अनेक तक्रारी महापालिकेकडे येऊन सुध्दा कोणतीही कारवाई झालेली नाही.

         महापालिकेकडे प्रमुख कीटकनाशकांचा “बफर स्टॉक’ उपलब्ध असतानाही नव्याने कीटकनाशक खरेदी करण्याचे कारण उलगडत नाही. कीटकनाशके उपलब्ध असताना ती वेळेत वापरली न गेल्याने मुदतबाह्य ठरणार असतील तर संबंधित कीटकनाशके वेळेवर का वापरली जात नाही, असा प्रश्‍न मात्र यानिमित्ताने उपस्थित होतो. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते सफाई यांत्रिक पध्दतीने करण्याकरता रोड स्वीपर मशिन खरेदीसाठी विशीष्ट कंपनीच्या गाड्या खरेदीसाठी अट्टहास का करण्यात आला? यातून नेमका कुणाला फायदा होणार होता.

         पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 4 जून 2020 रोजी झालेल्या सभेत आरोग्य्य खात्यातील अधिकारी ठेकेदाराकडून कसेेे पैसे वसूल करतो त्याचा पुरावा सत्ताधारी पक्षातील नगरसेवक तुषार कामठे यांनी सर्वांसमोर उघड केला होता.यात महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी अनिल रॉय यांच्या अकाउंटवर दोन लाख रुपये,बायोमेडिकल इंजिनियर सुनील लोंढे यांच्या अकाउंटवर २ लाख ४५ हजार २ लाख ३० हजार आणि सुनील बेळगावकर यांच्या अकाउंट वर ८० हजार रुपये जमा झाल्याचे पुरावेही सादर केले. सर्वसाधारण सभेत हा संपूर्ण प्रकार उजेडात आणून देखील अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त नियमबाह्य कामांना प्रोत्साहन व मुकसंमती देत आहेत. अशा अनेक प्रकारांमुळे संबंधित अधिकार्यांनी यातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता तथा संपत्ती जमविल्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपुर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून यात दोषी आढळणारे अधिकारी,कर्मचारी व मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ.अनिल राॅय, बायोमेडिकल अभियंता सुनिल लोंढे व उपअभियंता सुनिल बेळगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई व त्यांच्या मालमत्तेची व संपत्तीची ‘ईडी’ मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button