breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘विरोधी पक्षनेता आपल्या दारी’ उपक्रम

पिंपरी – महापालिकेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी जनतेत मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता शहरात  ‘विरोधी पक्षनेता आपल्या दारी ‘ उपक्रम हाती घेतल्याचे भोसरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला होता. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यानंतर पिंपरी पालिकेत पहिल्यांदाच ‘विरोधी पक्षनेता’ आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

याबाबत साने म्हणाले, ” प्रभागातील पक्षाच्या नगरसेवकांसोबत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक नाही.  तेथील माजी नगरसेवक, पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे. याचा पक्ष वाढीला देखील फायदा होईल. तसेच गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराचा बदललेला चेहरा जनतेसमोर मांडणार आहोत. शहाराचा कायापालट राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेला दिली जाईल. पक्षाचा मेळावा संपल्यानंतर हा उपक्रम सुरु करणार असल्याचे”, साने यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button