breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पुलवामा हल्ल्यासाठी ‘अमेझॉन’वरून खरेदी केलेले केमिकल, आणखी दोघांना अटक

नवी दिल्ली | पुलवामा येथे गेल्या वर्षी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आलेले केमिकल अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन मागवलं असल्याचं समोर आलं आहे. पुलवामा हल्ल्यात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिवाईस (IED) बनवण्यासाठी ज्या केमिकलचा वापर केला गेला, ते केमिकल ऑनलाईन मागवलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, वाईज उल इस्लाम आणि मोहम्मद अब्बास राथेड अशी दोन आरोपींची नावं आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या वाइज-उल-इस्लामने अमेझॉनवरुन आयईडी बनवण्यासाठीचं केमिकल मागवलं होतं.

एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेझॉनवर केमिकल ऑर्डर केल्याचं वाईजने मान्य केलं आहे आणि त्या केमिकलपासूनच आयईडी बनवण्यात आलं होतं. याशिवाय बॅटरी आणि अन्य सामनाही वाईजने मागवलं होतं. यासाठी वाईजला जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी निर्देश दिले होते.

अमेझॉनवरुन हे सर्व सामान मागवल्यानंतर वाईज याने हे सामान स्वत: जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना दिलं होतं. तर अब्बास गेल्या अनेक वर्षांपासून जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत होता. जैश-ए-मोहम्मदचा आरोपी आणि आयईडी एक्सपर्ट मोहम्मद उमरला आपल्या घरी आसरा दिला होता. उमर एप्रिल-मे महिन्यात 2018 ला काश्मीरमध्ये आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button