breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना विरोधात लढाई : विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मानले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा संसर्गाने जगभरात  हा:हा:कार माजविला असतानाच १२  मार्च रोजी या विषाणूचा पहिला रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये सापडला तेव्हा पासून आपण सर्व मंडळी युध्द पातळीवर जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहात. तुमच्या कार्यतत्परतेमुळे व कर्तव्य निष्ठेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकुण १२ कोरोना बाधित रुग्णांपैकी १० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. राहिलेले दोन रुग्ण देखील दोन दिवसात बरे होऊन जातील. शहरात कोरोना बाधित रुग्णांचा एकही मत्यू झालेला नाही. ही अत्यंत समाधानाची बाब आहे , यामागे तुम्हां सर्वांचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दांत महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आभार मानले आहेत.

       कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून सगळ्यात अगोदर आपणच त्याला सामोरे गेला आहात. कोरोना विरुद्धच्या या लढाईमध्ये आपण सर्वांनी सैनिकाप्रमाणे प्राणांची बाजी लावून लढत आहात, या तुमच्या कार्याला खरोखरच सलाम. फक्त कामाची जबाबदारी म्हणून हे काम न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण अहोरात्र गेल्या कित्येक दिवसांपासून अथकपणे न घाबरता रुग्ण सेवा करीत आहात हे खरोखरच अतुलनीय आहे. आपण रुग्णांना वैद्यकीय उपचार व मानसिक बळ देत आहात त्यामुळे रुग्णांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होऊन रुग्ण बरे होत आहेत.  सर्व देशवासीय आपआपल्या घरात कुटूंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेने कुटूंबियापासून, नातलगापासून दुर राहत सेवाभाव जपत आहात हे खरोखर कौतुकास्पद आहे. आपल्या या सेवाभावामध्ये आपल्या कुटूंबियांचा सुध्दा हातभार लागत आहे. त्यामुळे आपले कुटूंबियांचे सुध्दा आभार मानतो. व त्याबद्दल आपणां सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार

      पुन्हा एकदा मी कोरोना बाधित रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या माझ्या तमाम डॉक्टर्स, सिस्टर्स व आरोग्य कर्मचारी बंधू भगीनींना माझा मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच आपण सुरु ठेवू या. “मीच माझा रक्षक”  हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहेच. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या काही सुचना असतील तर त्या माझ्यापर्यंत निसंकोचपणे माझ्या पर्यंत जरुर पोहोचवा, असे आवाहनही नाना काटे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button