breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्हाबंदी उठवली, हॉटेल सुरू केले आहे. तसेच कार्यालयात उपस्थिती वाढवली याचा हा परिणाम आहे. कोरोनाचा संसर्ग हा संपर्काने वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मास्क वापरले नाही तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तरीदेखील बाहेर फिरताना मास्क वापरत नाही. कोरोनाची भीती बाळगू नये परंतु जागरुक राहणे आवश्यक आहे, असे देखील ते म्हणाले.

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाही. यावर टोपे म्हणाले, जशी रुग्णसंख्या वाढते तसा व्यवस्थेवर ताण पडतो. लक्षण नसलेल्या रुग्णांनी घरातचं क्वारंन्टाईन केले पाहिजे. महाराष्ट्राचा रीकव्हरी चांगला आहे. पुण्यात ऑक्सीजन बेड सुविधा वाढवल्या आहेत.

पुण्यातील जम्बो रुग्णालयातील 120 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याबद्दल बोलताना टोपे म्हणाले, जम्बो फॅसिलिटी बाबत आउटसोर्स केलं जातं. ज्यांना हे काम दिलं ही त्याबच्या जबाबदारी आहे. टेंडरच्या माध्यमातून काम करणं बंधनकारक आहे. त्यांना जमत नसेल तर बदलून टाका, नवीन घ्या. जम्बो रुग्णालयाचे उद्घाटन करण्यामागे रुग्णालय लवकर कार्यान्वित करावे हा हेतू होता. उद्घाटन करणे गैर नाही,पण ज्या उद्देशाने केले त्यांना सेवा मिळाली पाहिजे. तसेच जम्बो रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button