breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोना योद्धयाने केला आपला वाढदिवस स्मशानभूमीत साजरा

ठाणे – बृहन्मुंबई महानगरपालिकेत माटुंग्यातील मेंटेन्स विभागात काम करणारे नरेश पाटील यांनी आपला ५५ वा वाढदिवस आपल्या मित्रमंडळीच्या उपस्थित चक्क दिवा-दातिवलीच्या स्मशानभूमीत साजरा केला.

वाचा :-आनंदाची बातमी : मुंबई लोकल सुरू होण्याचा दिवस ठरला

मार्चपासून झालेल्या लॉकडाऊनपासून नरेश पाटील यांनी आपले मुंबई मनपातील काम अविरत सुरु ठेवले होते. प्रसंगी त्यांच्या नजरेसमोर त्यांनी अनेक कोरोना बांधितांचा मृत्यू पाहिला होता. अश्या प्रसंगी कोरोनाला न डगमगता काम करणारे नरेश पाटील यांना सुदैवाने सरकारी नियमांचे पालन केल्याने कोणतीही बाधा झाली नाही परंतु जर मला स्वतःला अशी वेळ आली असती तर माझा मृतदेह सुद्धा मिळाला नसता याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपला ५५ वा वाढदिवस आपल्याच गावातील स्मशानभूमीत करावयाचा ठरविला आणि सर्व मित्रमंडळीना बोलावून काल आपला वाढदिवस चक्क दिवा-दातीवलीच्या स्मशानभूमीत केक कापून साजरा केला. दरम्यान सदर घटनेचे परिसरात आचर्य व्यक्त केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button