breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘एमआयएम’च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरीत तिरंगी ध्वजाला सलामी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने खराळवाडी येथील पिंपरी विभागीय संपर्क कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र महासचिव अकील मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजास सलामी देऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र सचिव मुजावर म्हणाले की, देश प्रजासत्ताक होऊन ७० वर्ष झाली. मनुवादी केंद्र सरकारने या देशाला किती तोडण्याचा प्रयत्न केला, तरी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान या देशाला कायम स्वरूपी एकसंघ ठेवेल.
यावेळी धम्मराज साळवे, शफी काझी, संतोष शिंदे, अंजना गायकवाड, मशमूम नजीर, रौफ कुरेशी, सद्दाम हुसेन, शब्बीर शेख, हारून शेख, समीर शेख, नूर मुल्ला, रुकुमुद्दीन शेख आदी उपस्थित होते.