breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प

नवी दिल्ली – कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या पार्श्वभूमीवर आज मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोनामंदीतून सावरण्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने यंदा विनाकागद कारभार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर होणार आहे. मेड इन इंडिया टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचलले गेलेले हे पाऊल आहे. हा टॅब लाल रंगाच्या कापडात ठेवलेला आहे. दरम्यान, सरकारने डिजिटल बजेट सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा बजेट जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ‘Union Budget Mobile App’ची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे सामान्य लोकांनाही बजेट पाहता, वाचता येणार आहे.

आज सकाळी अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे अशी माहिती दिली. तसेच नेहमीप्रमाणे खाता वही म्हणजेच कागदपत्र असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे टॅब असल्याचे पहायला मिळाले. लाल रंगाचे कव्हर असणाऱ्या या टॅबवर राजमुद्रेचे चिन्ह होते.

दरम्यान, दरवर्षी अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक आठवड्याआधी प्रेसमधील कर्मचारी मंत्रालयातच थांबून काम करतात आणि या काळात त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. यंदामात्र छापील अर्थसंकल्पाऐवजी अर्थसंकल्प डिजिटल माध्यमातून सादर केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button