breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

माथेफिरू एसटीचालक संतोष मानेला फाशीऐवजी जन्मठेप

नवी दिल्ली  – स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून ती बेदरकारपणे चालवत पुण्यातील तब्बल नऊ लोकांच्या बळीस कारणीभूत ठरलेल्या एसटी चालक संतोष माने याला पुण्यातील सत्र न्यायालयाने एप्रिल २०१३ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देत मानेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. शिक्षा कमी करण्यासाठी त्याने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले होते. या अपिलावर आज सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने मानेची फाशीची शिक्षा कमी करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मानेला दिलासा मिळाला आहे.

ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने संतोष माने याला फाशी देण्यात येत असल्याचे सत्र न्यायालयाने निकाल देताना सांगितले होते. माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट एसटी बस स्थानकातून बस पळवून नेत भरधाव वेगाने हाकली होती. त्यात त्याने ४५ पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३७जण जखमी झाले होते. माने हा मनोरुग्ण असून, त्याने हे कृत्य वेडाच्या भरात केल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. वेडेपणात एखादा गुन्हा केला, तर त्या व्यक्तीला कलम ८४ नुसार शिक्षा होत नाही. या कलमाचा फायदा मानेला द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. घटनेच्या अगोदर २३ व २४ जानेवारी २०१२ रोजी माने याची मानसिक स्थिती ठीक होती. बचाव पक्ष माने हा वेडा असल्याचा एकही पुरावा सादर करू शकलेला नाही. त्यामुळे माने याला खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली दोषी ठरविण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button