breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्रीय अर्थसंकल्पात मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतुद करा

सम्यक विद्यार्थी आंदोलनची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी
२०२०-२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतुद करण्यात यावी. तसेच ती तरतुद रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली. या बाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर व जिल्हा अध्यक्ष शुभम चव्हाण, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड, ओमकार कांबळे, राहुल गायकवाड आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले की, डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती स्वातंत्र्यपूर्व काळात मागास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली होती. ती बंद करण्याचे षडयंत्र इथल्या मनुवादी केंद्र सरकारने रचले आहे. सुमारे ६२ लाख मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत. त्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. या मुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वाटचाल करण्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागणार आहे. म्हणून ह्या कठोर निर्णयाच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button