breaking-newsपश्चिम महाराष्ट्रमुंबई

कोरोनामुक्त गोपीचंद पडळकरांवर जेसीबीतून चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव

मुंबई – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर पडळकर यांच्यावर चक्क जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथील एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर आज (१२सप्टेंबर) पडळकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. याचनिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर पंढरपुरातील रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या शेकडो समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती भरून फुलांचा वर्षाव केला.राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच पडळकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आले. त्यानंतर ते पंढरपूरातील एका रुग्णालयात उपचार घेत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button