breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

एसी आता 16 नाही तर 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार…सरकारचा नवा नियम…

यावर्षी उन्हाऴ्यात एसी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर,सरकारचा नविन नियम माहित करून घ्यायला हवा…सरकारच्या नव्या नियमानुसार एसी आता 16 नाही तर 24 डिग्री सेल्सियस तापमानावरच सुरू होणार आहे. सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या एसीमध्ये डिफॉल्ट तापमान 24 अंश फिक्स केलेलं असेल. ऊर्जा बचतीसाठी नियम बनवणारी संस्था, ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने म्हणजेच बीईईने सरकारसोबत मिळून एनर्जी परफॉर्मंस स्टँडर्ड निश्चित केले आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

नव्या वर्षात नव्या सेटिंगसोबतच एसीचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाईल. BEE कडून स्टार रेटिंग मिळवणाऱ्या सर्व रूम एअर कंडिशनर्ससाठी 24 डिग्री ही डिफॉल्ट सेटिंग अनिवार्य करण्यात आली आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू झालेत. नव्या नियमांनुसार, एसी सुरू केल्यानंतर डिफॉल्ट सेटिंग 24 अंश असेल, पण नंतर तुमच्या सोयीप्रमाणे तापमान तुम्ही कमी-जास्त करु शकतात. ऊर्जा बचतीसाठी सरकारने हा नवा नियम आणला आहे.

डिफॉल्ट सेटिंगमुळे ऊर्जेची बचत होणार आहे.
बीईईने फिक्स्ड स्पीड रुम एअर कंडिशनर्ससाठी 2006 मध्ये स्टार लेबलिंग प्रोग्राम लाँच केला होता. हा प्रोग्राम नंतर 12 जानेवारी 2009 मध्ये अनिवार्य करण्यात आला होता. यानंतर 2015 मध्ये इनव्हर्टर रुम एअर कंडिशनर्ससाठी ‘वॉलंटरी स्टार लेबलिंग प्रोग्राम’ लाँच केला. हा प्रोग्राम नंतर 1 जानेवारी 2018 रोजी लागू झाला. रूम एअर कंडिशनर्ससाठी स्टार लेबलिंग प्रोग्रामने 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 4.6 अब्ज युनिट ऊर्जेची बचत केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button