breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनात दुबईची अर्थव्यवस्था धोक्यात, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचा अंदाज…

जेनब फत्ता | महारोगराईचा परिणाम आणि तेल किमतीतील घसरणीमुळे आखाती देशांत सध्या लाखो विदेशींना अडचणीचा सामना करावा लागला आहे. अरबसम्राट अनेक दशकांपासून आपली गावे झगमगाटातील महानगरात रूपांतरित करण्यासाठी विदेशींवर अवलंबून राहिले आहेत. अन्य देशांतून आलेले अनेक जण कुटुंबासह स्थायिक झाले तरीही त्यांच्या नागरिकत्वाबाबत व कायम निवासाची पात्रता प्राप्त करण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यांचे अस्तित्व कायम संकटात राहिले आहे. गेल्या काही काळात भारतीय, पाकिस्तानी आणि अफगाणी कामगार मोठ्या प्रमाणात मायदेशी परतले आहेत. 

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अंदाजानुसार, ९६ लाख लोकसंख्येच्या संयुक्त अरब अमिरात, ज्याचा दुबई एक भाग आहे, त्यात नऊ लाख नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. सर्वाधिक परिणाम दुबईवर पडेल. त्यांचे आर्थिक मॉडेल विदेशींच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. लोकसंख्येत हा ९०% हिस्सा आहे. शाळांत १५% प्रवेश घटतील इंटरनॅशनल स्कूल डेटाबेसनुसार, गेल्या वर्षी दुबईत मध्यम शाळेचा खर्च साडेआठ लाख रुपयांपेक्षा जास्त होता. दुबईच्या शाळा गुंतवणूकदार आणि खासगी इक्विटी फंड्सची सल्लागार फर्म महदी मटार म्हणाले, आता स्वस्त शाळेत प्रवेश होतील. फीसमध्ये कपात होईल. शाळांतील प्रवेश १० ते १५% कमी होतील, असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button