breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयई- पेपरपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

ब्रिटनच्या महाराणीच्या निधनाने राज ठाकरे हळहळले, ट्विटमधून राणीचं ९६ वर्षाचं आयुष्य सांगितलं!

मुंबई । महाईन्यूज ।

ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार, ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल ७० वर्षे बसलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडच्या बालमोरल कॅसलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल हिंदुस्थानसह अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय राजकारण्यांनी राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना झालेलं दु:ख व्यक्त करताना खास फेसबुक पोस्ट लिहिली आहे. राणी एलिझाबेथ २ ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं, असं राज आपल्या शोक संदेशात म्हणाले.

अनेक राजघराणी रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवली पण…
“ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचे निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित त्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे”.

“ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचे, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मागरिट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button