breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या संकटात रक्तदानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : आमदार सुनील शेळके

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्यातर्फे रक्तदान शिबीर

पिंपरी  । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा भरून काढणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, त्या भावनेतून रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर संघटनेने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते.

मोशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिष बारणे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्त संकलन अभियानात आपले योगदान दिले. कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.

‘कोरोना’ च्या साथीमुळे राज्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी कर्तव्य भावनेतून पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 115 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना आतिष बारणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मोशी येथील आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 यावेळी आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ताकाका साने माजी उपमहापौर शरदशेठ बोऱ्हाडे, नगसेवक वसंतशेठ बोराटे, नगरसेवक विक्रांत लांडे, मा. नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, उत्तम आल्हाट, नितिन सस्ते, निखिल बोऱ्हाडे, विशाल जाधव, राहुल बनकर , निलेश बोराटे, प्रशांत सस्ते, दीपक बारणे अदिनाथ बारणे, आकाश बारणे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद…

वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेने रक्तदान करावे आणि सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यालाच साद देत राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आतिष बारणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button