breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोविड लॅब होणार; आयुक्त श्रावण हर्डिकर यांची माहिती

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु केली जाणार आहे. आयसीएमआरकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मान्यता मिळून पुढील आठवड्यात वायसीएममध्ये कोविड लॅब सुरु होईल. त्यासाठी 24 लॅब टेक्निशन घेतले आहेत. त्यामुळे तात्काळ चाचण्या होतील, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्ण संख्या 1100 च्या पुढे गेली आहे. शहरातील कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) कडे पाठविले जात होते.

या संस्थेत केवळ 100 नमुने तपासून येत आहेत. तसेच भोसरीतील ‘नारी’संस्थेचीही क्षमता कमी आहे. यामुळे रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवसांचा विलंब होत आहे. ज्या वेळी नागरिकांचा स्वॅब तपासणीसाठी गोळा करण्यात येतो. तेव्हापासून त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल येईपर्यंत या नागरिकांना महापालिकेने उभारलेल्या केंद्रात क्वारंटाईन करण्यात येते.

अहवाल लवकर प्राप्त होत नसल्याने या सर्व नागरिकांना तीन ते चार दिवस एकाच ठिकाणी राहावे लागते. या सर्व प्रकारात एखादा नागरिक पॉझिटिव्ह असेल तर, इतर नागरिकांना त्याचा बरोबर राहिल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यासाठी स्वतंत्र लॅबची अत्यंत आवश्यकता होती.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, वायसीएम रुग्णालयात कोविड लॅब सुरु केली जाणार आहे. आयसीएमआरकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला आहे. पुढील आठवड्यात लॅब सुरु होईल. त्यासाठी 24 लॅब टेक्निशियन घेतले आहेत.

वायसीएममध्ये चाचण्या सुरु झाल्यास तात्काळ रिपोर्ट येतील. भोसरीतील राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्था (नारी) क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकाराला विनंती केली आहे. नारी चांगली संस्था असून शहरातच आहे. त्यांची तपासणी क्षमता दिवसाला 100 आहे. त्यामध्ये वाढ करावी. त्याचा पालिकेला फायदा होईल. जेणेकरुन जास्त तपासण्या होतील. एनआव्हीकडे 100 नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. शहरातील खासगी मेट्रो पोलिस या लॅबकडेही रिपोर्ट तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यांना महापालिका पैसे देत नाही. सीएसआरमधूनच तपासणी केली जात आहे. त्यांच्याशी करारनामा करण्यात येणार आहे. चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टीक यांच्याशी चर्चा सुरू आहे. तपासणीची क्षमता वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button