breaking-newsआंतरराष्टीय

कोरोनाची सुरुवात झालेल्या वुहान शहरात शाळा उघडणार

बीजिंग – चीनच्या वुहान शहरात मूळ सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या आजारामुळे लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले असून लाखो लोकांचा मृत्यूदेखील झाला आहे. मात्र आता या शहरात स्थिती पुन्हा पुर्वपदावर येताना दिसत असून, येथील शाळा पुन्हा उघडणार आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, वुहान आपल्या सर्व शाळा आणि किंडरगार्डनला पुन्हा सुरू करत आहे. वुहानमधील जवळपास २ हजार ४८२ शैक्षणिक संस्थांमध्ये १.४ मिलियन विद्यार्थी शिकतात. वुहान यूनिव्हर्सिटीदेखील उघडण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाईन शिक्षणात परतण्यासाठी इमर्जन्सी योजना तयार आहेत. विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की शाळेत येताना व बाहेर जाताना मास्क वापरावा आणि शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक टाळावी. शाळांना रोग नियंत्रण उपकरणांचा साठा करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. अनावश्यक सामूहिक कार्यक्रम घेणे टाळण्यास सांगितले आहे. या शहरात कोरोनामुळे जवळपास ३ हजार ८६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button