breaking-newsमुंबई

घरगुती गणपतीचं बादली किंवा ड्रममध्ये विसर्जन करा: मुंबई महापालिका

मुंबई- करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मनाई केली आहे. तसेच घरगुती गणपतींचं शक्यतो घरातच ड्रम किंवा बादलीत विसर्जन करावे, अशा सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत.

कोविड-१९ साथ रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्‍या संसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्‍सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहनपालिका व शासनस्‍तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्‍यात आले आहे. या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्‍सव – २०२० साजरा करताना विसर्जनादरम्‍यान पालन करावयाच्‍या आवश्‍यक सूचना यापूर्वी वेळोवेळी विविध माध्यमाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. महापालिकेची सर्व ती यंत्रणा गणेशाच्या विसर्जनासाठी सुसज्ज असून पालिकेने ४४५ विसर्जन स्थळे निश्चित केली आहेत. यासाठी सुमारे २३ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

घरगुती गणेशोत्‍सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्‍या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे

  • मुंबई शहरात एकूण ७० नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना थेट पाण्‍यात जावून मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.१ ते २ कि. मीटर अंतरातील गणेश भक्ताने यांच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक विसर्जन स्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्यावयाचे आहे.
  • नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
  • नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १६८ कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई असल्‍याने सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणे बंधनकारक आहे.
  • महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत. त्‍याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्‍त्‍यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्‍या
  • प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सिल्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीचे विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.
  • मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जनस्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
  • महापालिकेने विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करून फिरती विसर्जनस्‍थळे (mobile spots on wheel) निर्माण केलेली आहेत, त्‍याचाही लाभ भाविकांनी घ्‍यावा.
  • २०२० गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.
  • विसर्जना दरम्‍यान सोशल डिस्टन्सिंग, मास्‍क/मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात येत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button