breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाची बाधा होऊन आज 17 जणांचा बळी, तर आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर काही केल्या थांबायला तयार नाही. दररोज बाधितांची संख्या 500 च्या पुढे नोंद होत आहे. तर, मृत्युच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आज शहरातील 14 आणि शहराबाहेरील 3 अशा एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर शहरातील आणि शहराबाहेरील एकूण 163 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 7 हजार 368 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. 4 हजार 406 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 2 हजार 841 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 121 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आत्तापर्यंत शहरातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसाला सात ते आठ जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये चाळीशीच्या दरम्यानच्या रुग्णांचाही समावेश आहे. वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध गंभीर आजार असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. महापालिकेने रविवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहरातील 107 जणांचा तर शहराबाहेरील परंतु, महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 39 अशा 146 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

आजपर्यंत शहरातील 121 जणांचा मृत्यू झाला. तर, आजच्या दिवशी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 42 जणांचा मृत्यू झाल्याचे अपडेट आहे. त्यामुळे एकूण मृतांमध्ये आज एकाचदिवशी 17 जणांची भर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button