breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवनाथडीत खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक मेजवानीवर नागरिकांचा ताव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेला लाखो नागरिक भेट देत आहे. शाकाहारी-मांसाहारी पदार्थांबरोबरच विविध वस्तू खरेदी केल्या जात आहेत. सायंकाळी सादर होणा-या सांस्कृतीक कार्यक्रमांमुळे नागरिकांच्या मनोरंजनात भर पडत आहे.

शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविली आहे. उद्या जत्रेचा शेवटचा दिवस असल्याने पवनाथडीत नागरिकांची गर्दी वाढत आहे. लहान मुलांचे मनोरंजन होत आहे. तसेच, खवय्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळत आहे. तर, विविध वस्तूंची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाने जत्रेची रंगत वाढत आहे. लावण्या, हिंदी-मराठी चित्रपटातील गीतांवर कलाकारांच्या अदाकारी अविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. विविध वयोगटातल्या कलाकारांना याठिकाणी कला सादरिकरणाची संधी मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button