breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाची दक्षता, नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात ‘नो एन्ट्री’

आॅनलाईन ई-मेल, व्हाट्सअॅप, पत्राद्वारे समस्या, अडचणी मांडण्याच्या सुचना

मुख्यालय प्रवेशाद्वारासमोर सॅनेटायराझर अथवा वाॅशबेसिन लावण्याच्या सूचना

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या नऊवर गेली आहे. तसेच संशयित रुग्णाची संख्याही वाढतच चालली आहे. आज मध्यरात्रीपासून शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यात महापालिकेच्या मुख्यालयात पदाधिकारी, पत्रकार, अधिकारी-कर्मचा-याच्या व्यतिरिक्त अन्य सर्वसामान्य नागरिकांना मंगळवारपासून (दि.17) प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली आहे.

महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, अन्य महापालिकेच्या विविध विभागातील परिसरात 31 मार्चपर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. आजाराचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील काही भागात देखील जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील नागरिक दैनंदिन कामाकरिता महापालिका मुख्यालयात ये-जा करीत असतात. कोरोना बाधित रुग्णांची स्थिती स्थिर आहे. त्या बाधितावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, कित्येक नागरिकांना दैनंदिन कामानिमित्त महापालिकेत येत असतात. अनेकांची मुख्य कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यानूसार महापालिका कार्यालयात नागरिकांना 31 मार्च 2020 पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असेल. तर, नागरिकांनी महापालिकेत यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button