breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर निर्बंध; 247 जणांवर दंडात्मक कारवाई

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाईची मोहीम

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. लोकांमध्ये जनजागृती करुनही अनेकजण गोवा, मावा, पान खाऊन रस्त्यावरच थुंकू लागले आहेत. कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महापालिका आरोग्य विभागाने शहरात आज (सोमवारी) विशेष मोहीम राबवून तब्बल 247 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. के.अनिल राॅय यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकांत म्हटले की, कोरोनाचा संसर्ग आणि इतर आजारांचा विषाणू पसरु नये, म्हणून सर्व नागरिकांनी खबरदारी उपाय करणे गरजेचे आहे. त्याकरिता पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. या मोहीमेत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 247 जणांवर प्रत्येकी 150 रुपये प्रति व्यक्तीनूसार 37,050 रुपये दंडात्मक कारवाई केलेली आहे.

दरम्यान, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, तसेच कोरोना संसर्ग वाढू नये तसेच इतर विषाणू पसरवू नये याकरिता विशेष खबरदारी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button