breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोणताही पुरुष महिलेला स्पर्श करतो त्यावेळी त्याचा हेतू नक्की काय आहे, हे त्या महिलेला समजते – मुंबई हायकोर्ट

मुंबई | महाईन्यूज |

कोणताही पुरुष महिलेला स्पर्श करतो किंवा तिच्याकडे बघतो त्यावेळीच त्याचा हेतू नक्की काय आहे, हे त्या महिलेला समजते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मंगळवारी मांडले. उच्च न्यायालयात दाखल एका खटल्यातील सुनावणीवेळी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे निरीक्षण नोंदविले.

उद्योगपती विकास सचदेव यांच्याविरोधात एका महिला कलाकाराचा विमानात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. डिसेंबर २०१७ मधील ही घटना आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले असून, तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याच शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने शिक्षेला तूर्त स्थगिती दिली असून, त्यांची बाजू ऐकून घेण्यास होकार दिला. यावेळीच न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.

भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने विकास सचदेव यांना दोषी ठरविले आणि त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. पण सत्र न्यायालयाने निकाल दिला त्याचदिवशी त्यांना जामीनही मंजूर केला. त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा तीन महिन्यांसाठी स्थगितही केली. यानंतर २० फेब्रुवारीला त्यांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button