breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोट्यवधींची फसवणूक करणा-या पिंपरीतील माजी नगरसेविकेच्या मुलाला अटक

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेविका नंदा ताकवणे यांचा उद्योजक असलेल्या मुलाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. जमीन खरेदी व्यवहारात कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 

रविराज विकास ताकवणे असे त्याचे नाव आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका नंदा ताकवणे यांचा मुलगा आहे. 27 एकर जागेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात 13 कोटी 91 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. याप्रकरणी श्रीप्रकाश विजयकुमार सरदेसाई (रा. मलबार हिल, मुंबई) यांनी मलबार हिल पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. ताकवणे याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदाराच्या कुटुंबीयांची पिंपरी-चिंचवड एमआयडीसीमध्ये 27 एकर जागा होती. ही जागा एमआयडीसीकडून रीतसर हस्तांतरित करून घेतली होती. कंपनीचे मूळ मालक विनायक सरदेसाई यांचे निधन झाले. त्यांची मुले विदेशात असल्याने त्यांनी या जागा विक्रीचा निर्णय घेतला. त्यासाठी रविराज ताकवणे यांच्या बरोबर व्यवहार ठरला. ताकवणे यांनी 27 एकराचे 14 कोटी 50 लाख रुपये टप्याटप्याने द्यायचे ठरले.

दोघांमध्ये 5 मे 2019 रोजी परस्पर सामंजस्य करार झाला. प्रत्यक्षात ताकवणे यांनी केवळ 59 लाख रुपये दिले. उर्वरित 13 कोटी 91 लाख रुपये दिले नाहीत. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button