breaking-newsपिंपरी / चिंचवड

यापुढे स्थायीची सभा बुधवारी नव्हे तर मंगळवारी होणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर हे विविध कारणास्तव स्थायी समितीच्या सभेला अनुउपस्थितीत राहू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या स्थायी समिती सदस्यांनी दर बुधवारी होणारी बैठक यापुढे मंगळवारी घेण्याचा निर्णय घेतला असून तसा ठराव करुन त्याला मान्यता दिली आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पुर्वी दर मंगळवारी होणारी सभा बुधवारी घेण्यास  माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी सुरुवात केली. मात्र, माजी अध्यक्षांनी सुरु केलेली प्रथा यापुढे चालू ठेवणार नाही. बुधवारी व्यवस्थित कामकाज होत नाही. अनेक कारणास्तव आयुक्तांना सभेला हजर राहत नाहीत. हे स्थायी समिती सदस्यांच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे यापुढे स्थायी समितीची सभा पूर्वीप्रमाणे दर मंगळवारी दुपारी दोनला घेण्यात येणार आहे. समितीने पुर्वीच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यामध्ये आणखी एका निर्णयाचा समावेश झाला आहे. या निर्णयामुळे इतर विषय समितीच्या सभाचे नियोजन बदलावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button