breaking-newsराष्ट्रिय

केदारनाथ जवळच्या पवित्र गुहेमध्ये मोदींची ‘ध्यानधारणा’

सातव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आता पंतप्रधान मोदी केदरानाथ जवळील एका गुहेमध्ये ध्यानाला बसले आहेत. मोदी स्वत: २ किलोमीटर पायी चालत गुहेपर्यंत गेले.

प्रसारमाध्यमांच्या विनंतीवरुन त्यांनी गुहेमधील काही फोटो काढण्याची परवानगी दिली. सकाळपर्यंत मोदींची ही ध्यान धारणा चालेल. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे म्हटले आहे. प्रसारमाध्यम किंवा कुठल्याही व्यक्तीला गुहेच्या आसपासच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ९.३०च्या सुमारास डेहराडूनच्या विमानतळावर उतरले आणि विशेष हेलिकॉप्टरने केदारनाथला आले.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Prime Minister Narendra Modi meditates at a holy cave near Kedarnath Shrine in Uttarakhand.

3,430 people are talking about this

केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी परिसरात सुरु असलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात आले. तिथे त्यांनी विधीवत पूजा केली आणि विजयासाठी साकडं घातलं. रविवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन विधीवत पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक गढवाली पोशाखही परिधान केला होता. नरेंद्र मोदी हे १९ तारखेला म्हणजेच उद्या बद्रीनाथाच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत अशीही माहिती समजते आहे. केदारनाथ मंदिराबाहेर आल्यानंतर मंदिराबाहेर असलेल्या भाविकांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. इतकंच नाही तर काही भाविकांनी फूल देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागतही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button