breaking-newsमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मानसिक पराभव, राज ठाकरे यांची टिका

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टिका केली आहे.पाच वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार संपताना झालेल्या पत्रकार परिषदेला आलेच कशे? जर अमित शाह हेच सगळं बोलणार होते तर मग मोदीं तेथे गेलेच कशाला?, यावरून मोदींनी आता मानसिक पराभव मान्य केलेला दिसतो. एवढंच नाही तर पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढं का घाबरतात? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या मोदींचा मानसिक पराभव झाल्याचीही टीका ठाकरे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लोकांचे बोलणे ऐकण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची हिंमत उरलेली नाही. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात याचं उत्तरही त्यांनी पत्रकारांना द्यावं, अशीही मागणी राज ठाकरेंनी केली आहे. ज्या पत्रकार परिषदेत मोदी बोललेच नाहीत, त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं असंही राज ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतके दिवस दादागिरी केली, ती दादागिरीच त्यांना भोगावी लागणार आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेने एकही उमेदवार उभा केला नाही. मात्र महाराष्ट्रात गाजल्या त्या राज ठाकरेंच्या १० प्रचारसभा. कारण मोदी आणि शाह यांना हटवा हे सांगत त्यांनी प्रचार केला. या दोघांच्या हातून देश सोडवण्याची गरज आहे, असं मत त्यांनी आपल्या प्रत्येक प्रचारसभेत व्यक्त केलं. त्यामुळे उमेदवार उभा न करताही चर्चा रंगली ती मनसेच्या सभांची. रविवारी लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्याआधी शुक्रवारी भाजपाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. मात्र, पंतप्रधानांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही.

शनिवारी सकाळीही मोदींची पत्रकार परिषद म्हणजे मन की बात नाही तर मौन की बात होती असं ट्विटही राज ठाकरेंनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button