breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

केजरीवाल शपथविधी सोहळ्यात अण्णा हजारेंना निमंत्रण नाही

अहमदनगर – आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे सहभागी होणार नाहीत, असं अण्णांच्या राळेगणसिद्धी कार्यालयानं स्पष्ट केलंय. अण्णांचं मौन आंदोलन सुरू असल्यानं अण्णा केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचंही स्पष्टीकरण देण्यात आलंय. तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाकडून मात्र अद्याप अण्णा हजारेंना निमंत्रण धाडलं नसल्याचं सांगण्यात आलंय.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फासावर चढवा अशी मागणी करत अण्णांनी मौन आंदोलन सुरू केलंय. गेल्या २० डिसेंबरपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. अण्णांचे एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ होणार आहेत. दिल्लीत १६ डिसेंबर रोजी रामलीला मैदानात केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देण्यात आलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button