breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

केजरीवालांसमोर भाजपचा उमेदवार पराभूत तर काँग्रेसचा नवखा उमेदवार मैदानात

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेसला नवी दिल्लीच्या जागेवर उमेदवार उतरवण्यासाठी खूप दमछाक करावी लागली. सेलिब्रिटी, लोकसभा, राज्यसभेच्या खासदारांशी चर्चा केल्यानंतरही कोणी तयार झाले नाही. अखेर सुनील यादव यांना उतरवण्यात आले. ते भाजयुमोचे अध्यक्ष आहेत. त्यांना पालिका निवडणुकीचा अनुभव आहे. २०१२ मध्ये काँग्रेस उमेदवारांनी त्यांना धूळ चारली होती. तत्पूर्वी दिल्ली निवडणुकीत भाजपचा जुना मित्र अकाली दलाने २२ वर्षांची युती तोडली.

जेजेपीसोबतही जुळले नाही. त्यानंतर जदयूला संगम विहार, बुराडी या दोन जागा तर लोकजनशक्ती पार्टीला सीमापुरी ही जागा देण्यात आली. भाजपचे उमेदवार पाहून भाजपने शरणागती पत्करली आहे, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया सौरभ भारद्वाज यांनी ट्विटद्वारे दिली.काँग्रेसने ५ उमेदवारांची नावे मंगळवारी पहाटे जाहीर केली. मादिपूरहून जे.पी. पवार, विकासपुरी येथून मुकेश शर्मा, बिजवासन मतदारसंघातून परवीन राणा, महरौलीमधून पमोहिंदर चौधरी, आेखला मतदारसंघातून आसिफ मोहंमद यांच्या ऐवजी माजी मंत्री व माजी राज्यसभा खासदार परवेझ हाश्मी यांना उमेदवारी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button