breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दूरदृष्टीतील रूग्णालये ठरताहेत वरदान- संजोग वाघेरे पाटील

पिंपरी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून भोसरी, जिजामाता, थेरगाव, आकुर्डी, तालेरा अशा रुग्णालयांचे नियोजन करण्यात आले होते. गोर-गरिबांसाठी वैद्यकीय सुविधा सक्षमीकरणावर भर देत या रुग्णालयांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. ही रुग्णालये कोरोनाच्या संकटाच्या घडीला ख-या अर्थाने पिंपरी चिंचवडकरांसाठी वरदान ठरत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून शहराचा चेहरा मोहरा बदलला. पंधरा वर्षाच्या कार्यकाळात सर्वांगीण विकास घडवून आणला. अनावश्यक कामांवर करदात्यांचा पैसा खर्च केला नाही. फक्त भौतिक विकासावर नव्हे, तर शहराच्या सदृढ आरोग्यावर तितक्याच प्राधान्याने लक्ष देण्याची भूमिका अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची होती. गोर-गरिबांसाठी जास्तीत आरोग्य, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यावर वेळोवेळी भर दिला. हे आजच्या कोरोनाच्या महाभयंकर अशा संकट काळात प्रकर्षाने जाणवत आहे.

अजितदादांच्या सूचनेनुसार शहरात वेगवेगळ्या प्रकारची रुग्णालये, दवाखाने उभारण्यावर भर दिला गेला. त्याचे उत्तम उदाहरण भोसरीतील गावजत्रा मैदानावर उभारलेले १०० खाटांचे सुसज्ज नवीन भोसरी रुग्णालय म्हणावे लागेल. भोसरीतील हे रुग्णालय कोरोना काळात शहराच्या मदतीला आले. वर्षभरात या रुग्णालयात असंख्य नागरिक उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. यासह थेरगाव रुग्णालय १०० खाटा, पिंपरीतील जिजामाता रुग्णालय १०० खाटा, चिंचवड येथील जुन्या तालेरा रुग्णालय १३९ खाटा, आकुर्डी रुग्णालय १०० खाटा बांधण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केले गेले. महानगरपालिकेच्या या रुग्णालयात नागरिकांना सहाशेहून अधिक खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड कार्यन्वित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्यावर महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅट उभारण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या दूरदृष्टीतून उभारलेली ही रुग्णालये आज कोरोनासारख्या महाभयंकर संकटात शहरातील गोर-गरिब वर्गांच्या वैद्यकीय उपाचारासाठी उपयोगी ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून अजितदादांचे हे कार्य आम्हाला कौतुकास्पद वाटते‌, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.

वाचा- नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांत उच्चांकी वाढ; ३ हजार ९५३ नवे रुग्ण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button