breaking-newsराष्ट्रिय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या घरी चोरी; एकाला अटक

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील घरात चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मुंबईतील गांवदेवी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून एकाला अटक केली असून अटक करण्यात आलेली व्यक्ती त्यांच्याच घरी काम करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त केले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये रेल्वे आणि अर्थ मंत्रालयाशी निगडित महत्त्वाची माहिती सापडली आहे. तसंच त्या व्यक्तीने अन्य तीन जणांच्या इमेलवर ही माहिती पाठवल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे. सदर व्यक्ती अन्य व्यक्तींपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवत असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पीयूष गोयल यांच्या घरातून काही चांदीच्या आणि अन्य धातूच्या वस्तू चोरीला गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही घटना समोर आली होती. 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान ही घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे. यानंतर गोयल यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दरम्यान, विष्णु कुमार विश्वकर्मा असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून गोयल यांच्या मुंबतीली निवासस्थानी काम करत होता. सध्या त्याचा जप्त करण्यात आलेला मोबाईल सायबर सेलकडे पाठवण्यात आला असून त्यानं डिलिट केलेल्या इमेलचीही रिकव्हरी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोधही पोलीस घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button