breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्राची ‘होशियारी’, भगतसिंह कोश्यारींना राज्यपालपदावरुन हटवण्याची चिन्हं

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात केंद्रस्थानी राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणाऱ्या कलराज मिश्र यांची महाराष्ट्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून हातची सत्ता गमावल्यानंतर केंद्राकडून प्रतिमा सुधारण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. पहाटेच्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे राज्यपाल टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे कोश्यारी यांची दुसऱ्या राज्यात उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button