breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कोविड सेंटरजवळ गाडीत म्युझिक लावून जोरदार डान्स सुरु होता आणि तितक्यात…

उपनगरात विलेपार्लेमध्ये करोना केंद्राजवळ धिंगाणा घातल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गाडयांमध्ये मोठया आवाजात म्युझिक सिस्टिम लावून हे सर्वजण रस्त्यावर जोरदार डान्स करत होते. 

रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हे अंधेरीचे रहिवाशी आहेत. रात्रीच्यावेळी मुंबईत संचारबंदी असूनही ते रस्त्यावर गाडया घेऊन फिरत होते.

हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन आहे. आयपीसीच्या विविध कलमातंर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button