breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड मनसेच्या अतिरिक्त कामकाजाची जबाबदारी किशोर शिंदे यांच्यावर

पिंपरी – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवडमधील विस्तारित कामकाज पाहण्सायाठी शहरात पदाधिका-यांची कमतरता असल्याने पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी याची दखल घेतली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे यांच्यावर पिंपरी-चिंचवडच्या अतिरिक्त कामकाजाची जबाबदारी सोपविली आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सचिन चिखले हे मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत. त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाचीही धुरा देण्यात आली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त शहरावर मनसेचा प्रभाव टाकणारा एकही ताकदीचा पदाधिकारी पक्षाकडे नाही. त्यामुळेच मध्यंतरी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहर सचिव रुपेश पटेकर यांच्यावर महत्वाच्या जबाबदारी सोपविली आहे. मात्र, अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याचे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्यावर शहराच्या अतिरिक्त कामकाजाची जबाबदारी सोपविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button