breaking-newsआंतरराष्टीय

कॅनडामध्ये उष्णतेच्या लाटेचे 19 बळी

मोंट्रेयल (कॅनडा) – कॅनडाच्या पूर्व भागातील क्‍युबेक भागामध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत 19 जण मरण पावले आहेत. यापैकी 12 जण क्‍युबेक प्रांताची राजधानी मोंट्रीयलमध्ये मरण पावले, तर या शहराच्या पूर्वेकडील ग्रामीण भाग असलेल्या ईस्टर्न टाऊनशीपमध्ये गेल्या 48 तासांमध्ये आणखी 5 जणांचा मृत्यू झाला.

गेल्या बुधवारी मोंट्रीयलचे उपनगरात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे रेडिओ कॅनडाने म्हटले आहे. मरण पावलेल्या व्यक्‍ती विरळ लोकवस्तीतील, ज्येष्ठ नागरिक, मुले आणि दीर्घकाळापासून आजारी आणि मनोरुग्ण होते, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक मेलेन ड्रौन यांनी सांगितले.

या भागातील तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. हवेतील आर्द्रतेमुळे हे तापमान 40 अंशाच्या आसपास गेल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे

पंतप्रधान जस्टीन ट्रुडेउ यांनी या मृतांच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्‍त केली आहे. मध्य आणि पूर्व कॅनडामध्ये अतिउष्ण तापमान नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या बचावाची काळजी घेण्याच्या सूचनाही ट्रुडेउ यांनी केल्या आहेत. 2010 साली अशाच उष्णतेच्या लाटेमुळे मोंट्रीयल प्रांतात किमान 100 जणांचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button